Deepika Padukone Ramp Walk Video : सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. दीपिकाने आई झाल्यापासून तिच्या लेकीच्या संगोपनासाठी कामातून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे ती खूप कमी वेळा मीडियाच्या कॅमेऱ्यात दिसते. मात्र, आता 'मम्मा' दीपिकाने पहिल्यांदाच रॅम्प वॉक केला आहे. आई झाल्यानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. या फॅशन शोमध्ये दीपिकाच्या स्टनिंग लूकने सर्वांचं लक्ष वेधलं. दीपिकाच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.


'मम्मा' दीपिका पदुकोणचा पहिलाच रॅम्प वॉक


मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणने आता पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात दीपिका पदुकोणने आकर्षक रॅम्प वॉक केला. आई झाल्यानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच रॅम्पवर चालताना दिसली. तिचा चेहऱ्यावरील पाहून सर्वांनाच तिच्यावर नजर हटवणं कठीण झालं होतं. पांढरी ट्रेंच कोट, टॉप आणि पँट असा तिचा लूक होता. यासोबत आकर्षक सब्यसाची नेकलेस, ज्यामध्ये चोकर आणि रुबी-डायमंड क्रॉस पेंडेंटचा समावेश होता.


फॅशन शोमध्ये स्टनिंग लूकने वेधलं लक्ष


सब्यसाचीच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या फॅशन शोची सुरुवात दीपिकाने धमाकेदारपणे केली. काळ्या लेदर ग्लोव्हजवर बसवलेले ब्रेसलेट आणि हेडबँड तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवत होते. दीपिकाने तिच्या लूकसोबत चष्माही लावला होता. अभिनेत्रीच्या लूकचे कौतुक होत आहे. दीपिकाची सर्वत्र चर्चा होत आहे. दीपिका दरवेळी हे सिद्ध करते की तिला स्टाईल आणि ग्रेसमध्ये कोणतीही स्पर्धा नाही.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Chhaava : "तो सीन डिलीट करा", छावा चित्रपटाच्या वादावरुन उदयनराजेंचा थेट दिग्दर्शकाला फोन; लक्ष्मण उतेकर म्हणाले...