Rashmika Mandanna On Her Retirement: रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या साऊथ इंडस्ट्रीच (South Industry) नव्हे, पण बॉलिवूडमध्येही (Bollywood) आपला ठसा उमटवतेय. दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत अनेक प्रोजेक्ट्सवर रश्मिका सध्या काम करतेय. तिला नॅशनल क्रशचा टॅगही मिळाला आहे. रश्मिकानं आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपट केलेत, नुकत्याच गाजलेल्या पुष्पा 2 मध्येही रश्मिकानं दमदार अभिनयानं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. काही दिवसांपूर्वी जिम वर्कआऊट करताना रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे तिचा आगामी चित्रपट 'सिकंदर'चं शुटिंग काही काळासाठी थांबवलं होतं. एका पायाला प्रॅक्चर झालं असून त्याच अवस्थेत रश्मिकानं तिचा आगामी चित्रपट 'छावा'च्या प्रीमिअर शोला हजेरी लावली होती. 


रश्मिका मंदान्ना 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये दिसली होती, जिथे तिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळीता तिचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'छावा' चित्रपटात रश्मिका महाराणी येसूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, अलिकडेच तिनं केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांना धक्का बसला आहे.


रश्मिका 'छावा'नंतर रिटायर होणार?


मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका मंदानानं ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात तिच्या निवृत्तीबाबत वक्तव्य केलं. यावेळी ती म्हणाली की, "दक्षिणेतून येणाऱ्या मुलीसाठी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणं खरं तर स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे आणि म्हणूनच मी दिग्दर्शक लक्ष्मण सरांचे आभार मानायचे आहेत. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. " याचवेळी बोलताना रश्मिकानं निवृत्तीबाबत वक्तव्य केलं. ती म्हणाली की, "मला लक्ष्मण सरांना सांगायचं आहे की, छावानंतर मी निवृत्त होण्यास पूर्णपणे तयार आहे. मी रडणाऱ्या अभिनेत्रींपैकी नाही, पण हा ट्रेलर पाहून मी खूपच भावूक झाले." 


दरम्यान, आगामी चित्रपट 'छावा'मध्ये विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या फिल्ममध्ये आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, प्रदीप रावत आणि नील भूपालम यांसारखे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. येत्या 14 फेब्रुवारी रोजी चित्रपट रिलीज केला जाणार आहे. 


पाहा ट्रेलर : 



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


सगळीकडे विकी कौशलच्या 'छावा'ची चर्चा, पण 'या' मराठमोळ्या हिरोने नाकारली भूमिका; कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!