मुंबई : एका ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने तब्बल आठ कोटी रुपयांची मागणी केली. तीन दिवसांच्या अॅड शूटसाठी दीपिकाने ही अट घातली आहे. म्हणजेच दीपिकाची एका दिवसाची फी सुमारे 2.66 कोटी असेल. ही डील फायनल झाली तर ती शाहरुख खान, आमीर आणि रणबीरच्या बरोबरीला येईल. स्पोर्ट सेलिब्रिटींमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहलीची फी देखील जवळपास एवढीच आहे.

 

कोणत्या कंपनीशी बातचीत सुरु

 

एका एअरलाईन कंपनीच्या जाहिरातीसाठी ही बातचीत सुरु आहे. या करारावर स्वाक्षरी केली तर 'ए' लिस्टर असलेल्या दीपिकाची जाहिरात फी सर्वाधिक असेल. सध्या प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ या अभिनेत्री एक दिवसाच्या जाहिरातीसाठी एक कोटी रुपये फी घेतात.

 

सुत्रांच्या माहितीनुसार, तीन दिवसांच्या शूटसाठी दीपिकाने आठ कोटी रुपये मागितले आहे. म्हणजे एका दिवसाची फी सुमारे 2.66 कोटी रुपये.

 

जाहिरातीसाठी दिवसाच्या हिशेबाने पैसे

 

- सामन्यता: अड शूटसाठी दिवसाच्या हिशेबाने पैसे दिले जातात. एका दिवसाच्या जाहिरातीसाठी दीपिका 1.5 कोटी रुपये घेते. पण दीपिकाने या जाहिरातीसाठी शाहरुख, सलमान, आमीर आणि रणबीर यांच्या एवढेच पैसे मागून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

 

- स्पोर्ट्स सेलिब्रिटींमध्ये महेंद्रसिंह धोनी एवढी मोठी रक्कम घेतो. तर विराटही नुकताच या आकड्यापर्यंत पोहोचला आहे.

 

करार शेवटच्या टप्प्यात?

 

- दीपिका आणि एअरलाईन्स कंपनी यांच्यातील बातचीत शेवटच्या टप्प्यात आहे.

 

- पण दीपिकाच्या टीमला याबाबत विचारलं असता त्यांनी स्पष्ट बोलण्याचं टाळलं. त्यामुळे दीपिकाला एवढी मोठी रक्कम मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

 

- बॉलिवूडची टॉप अभिनेत्री असलेल्या दीपिकाची मार्केट व्हॅल्यू जास्त आहे. तिचा पिकू आणि 'बाजीराव मस्तानी' हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते.