Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका  पदुकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. गेली 14 वर्ष दीपिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दीपिकानं ओम शांती ओम  (Om Shanti Om) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दीपिकाबरोबरच शाहरूख खान (Shahrukh Khan) , श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अर्जुन रामपाल (Arjun rampal) यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका सकारल्या होत्या. दीपिकानं तिच्या या पहिल्याच चित्रपटामधील अभिनयानं प्रेक्षकांती मनं जिंकली. पण अनेकांना असा प्रश्न पडत असेल की दीपिकानं या चित्रपटात काम करण्यासाठी किती मानधन घेतलं असेल. जाणून घेऊयात दीपिकताच्या मानधनाबाबत


सध्या एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी दीपिका कोट्यवधींचे मानधन घेते. पण दीपिकानं तिच्या पहिल्या चित्रपटासाठी म्हणजेच 'ओम शांती ओम'साठी मानधन घेतलं नाही. म्हणजे एकही रूपया न घेता दीपिकानं या चित्रपटात काम केले आहे. 9 नोव्हेंबर 2007 रोजी ओम शांती ओम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते. 






ओम शांती ओम चित्रपटाच्या कथानकाला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 'एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो महेश बाबू...', या दीपिकाच्या या चित्रपटातील डायलॉगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


संबंधित बातम्या


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चे नवे पोस्टर प्रदर्शित, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha