मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांचा 'पद्मावती' अवघ्या महिन्याभरात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाच्या रीलिजच्या तोंडावर दोघांमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चिन्हं आहेत. रणवीर आणि दीपिका यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगली आहे.
जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या 'अभिमान' चित्रपटाप्रमाणे काहीशी परिस्थिती दोघांमध्ये निर्माण झाल्याची चर्चा आहे. रणवीरला मिळालेल्या प्रसिद्धीच्या जळफळाटातून दीपिकाला असुरक्षिततेनं ग्रासल्याचं म्हटलं जात आहे.
पद्मावतीच्या 3D ट्रेलर लाँचला परस्पर हजेरी
आपल्याला साधी कल्पनाही न देता दीपिकाने 'पद्मावती'च्या 3D ट्रेलर लाँचला हजेरी लावल्यामुळे रणवीरचं मन दुखावल्याचं दिसत आहे. रणवीरने तीन ट्वीट्स टाकत तसे संकेतच दिले आहेत. त्यामुळे 2013 मध्ये 'रामलीला'पासून सुरु झालेलं अफेअर चार वर्षांनी संपुष्टात येण्याची भीती दोघांच्या चाहत्यांना सतावत आहे.
दोनच दिवसांपूर्वी दीपिका 'पद्मावती'च्या 3D ट्रेलर लाँचला उपस्थित राहिली होती. दीपिका आली, मात्र रणवीर-शाहिद हे तिचे चित्रपटातले दोन मुख्य सहकलाकार न आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
खरं तर रणवीर सिंह आणि शाहिद कपूरच काय, तर दीपिकालाही या ट्रेलर लाँचचं निमंत्रण नव्हतं. या तिघांनी स्वतः उपस्थित राहण्याची गरज नसल्याचं आयोजकांनी त्यांच्या टीमला कळवलं होतं.
दीपिकाने सरप्राईझ देत या सोहळ्याला आगंतुकपणे हजेरी लावली. मात्र दीपिकाने येताना तिच्या दोन्ही सहकलाकारांना पुसटशी कल्पना देणं अपेक्षित होतं. एकवेळ शाहिदचं सोडलं, तरी ही गोष्ट बॉयफ्रेण्ड रणवीरच्या कानावर घालणं साहजिक होतं. पण तिने तसं न केल्यामुळे रणवीरचा इगो दुखावला, असं दिसतंय.
विशेष म्हणजे दोघांनीही आपण बिझी असल्याचं दीपिकाला सांगितलं नव्हतं. त्यामुळे तिने न विचारता परस्पर जाणं दोघांनाही खटकलं. शाहिद घरीच बसून होता, तर रणवीर टाइमपास म्हणून फुटबॉल खेळत होता. त्यामुळे वेळेत कळवलं असतं, तर तिघंही ट्रेलर लाँचला गेलो असतो, अशी त्यांची धारणा झाली.
दीपिका इनसिक्युअर
पद्मावतीचा ट्रेलर लाँच झाल्यापासूनच दीपिका अस्वस्थ झाल्याचं म्हटलं जात आहे. ट्रेलरमध्ये दिसणारा रणवीरचा अल्लाउद्दिन खिल्जी चाहत्यांची वाहवा मिळवत आहे. तर शाहिदच्या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांची दाद मिळत आहे.
दुसरीकडे, टायटल रोल असूनही पद्मावतीच्या वाट्याला फारसं कौतुक आलेलं नाही. त्यामुळे दीपिकाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचं म्हटलं जातं. घुमर गाणं रीलिज झाल्यानंतरही तिची फारशी प्रशंसा न झाल्यामुळे दीपिका नाराज असल्याची चर्चा आहे.
'पद्मावतीचा 3D ट्रेलर काल पाहिला. हा ट्रेलर मी आ वासून पाहत होतो. मी पहिल्यांदाच स्वतःला 3D मध्ये पाहिलं.' असं रणवीरने पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/RanveerOfficial/status/925321254751662081
'आज पहिल्यांदाच एका माशीने मला डंख मारला. मी तिचा फोटो टाकणार होतो. पण म्हटलं उगाच त्या माशीला प्रसिद्धी कशाला द्या' असं म्हणत पाठीत खंजीर खुपसल्याची भावना रणवीरने बोलून दाखवली.
https://twitter.com/RanveerOfficial/status/925322248562593792
'या सगळ्या पहिल्या गोष्टींमध्ये, माझ्या उर्वरित आयुष्याचा हा पहिला दिवस आहे. आय अॅम डन' असं तिसऱ्या ट्वीटमध्ये रणवीर म्हणतो. त्यामुळे रणवीर आणि दीपिका यांचं ब्रेकअप झाल्याचं बॉलिवूडमध्ये म्हटलं जात आहे.
https://twitter.com/RanveerOfficial/status/925322483045228544