Current Laga Re Song:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा त्याच्या सर्कस (Cirkus) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सर्कसमधील करंट लगा रे (Current Laga) हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. या गाण्यातील दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीरच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधलं. काही लोकांची या गाण्याला पसंती मिळाली. तर काही नेटकरी या गाण्याला ट्रोल करत आहेत. नुकताच या गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला पाहून रणवीर आणि दीपिकाचं करंट लगा हे गाणं कॉपी केलं आहे का? असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडला आहे. 


दिपराज जाधव यानं त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन करंट लगा रे गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'करंट लगा रे' या गाण्यासोबतच अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर या चित्रपटातील गाणं मिक्स केलं आहे. या दोन्ही गाण्यांचे संगीत सारखेच आहे, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 
'टॉलिवूडची कॉपी नेहमी बॉलिवूड करते.' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला केली आहे. तर दुसऱ्या युझरनं कमेंट करत लिहिलं, 'आधी ते चित्रपट कॉपी करत होते आता ते गाणी कॉपी करत आहेत.'


पाहा व्हिडीओ: 






सर्कस हा चित्रपट 23 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी यानं केलं आहे. या चित्रपटात रणवीरसोबतच जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, सिद्धार्थ जाधव हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील सुन जरा हे गाणं देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Cirkus Song Sun Zara : रणवीरच्या 'सर्कस' चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज; 23 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला