Avatar The Way Of Water Box Office Collection Day 3 : 'अवतार 2' (Avatar 2) म्हणजेच 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 2009 साली या सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आता 13 वर्षानंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा जगभरात धमाका करत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला आपली जादू दाखवण्यात यश मिळाले आहे. या सिनेमाने रिलीजआधीच कोट्यवधींची कमाई केली होती. आता रिलीजनंतरदेखील हा सिनेमा कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. 






'अवतार 2'चं कलेक्शन जाणून  घ्या... (Avatar 2 Collection) : 


'अवतार 2' (Avatar 2) या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 41 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 42-43 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर तिसऱ्या दिवशी रविवारी या सिनेमाने 50 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत तीन दिवसांत या सिनेमाने 136.45 कोटींची कमाई केली आहे. तर या सिनेमाच्या इंग्लिश वर्जनने 24 कोटींचा गल्ला जमवला आहे. हिंदी या सिनेमाने 14 कोटी, तेलुगूत चार कोटी, तामिळमध्ये तीन कोटी आणि मल्याळममध्ये 45 कोटींची कमाई केली आहे. 


100 कोटींचा टप्पा पार


पहिला दिवस - 41 कोटी
दुसरा दिवस - 42-43 कोटी
तिसरा दिवस - 50 कोटी


'अवतार 2'ची (Avatar 2) 200 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच होणार एन्ट्री


'अवचार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. रिलीजच्या दुसऱ्याच वीकेंडला हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जगभरात हा सिनेमा 250 मिलिअन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींची कमाई करणार आहे. 


'अवतार 2' हा सिनेमा जेम्स कॅमेरॉनने (James Cameron) दिग्दर्शित केला आहे. या अॅनिमेशन सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. हा तगडी स्टारकास्ट असलेला सिनेम आहे. 250 मिलिअन डॉलरमध्ये या बिग बजेट सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. पुढील वर्षात या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Avatar 2 : रिलीज डेट, स्टारकास्ट, बजेट; जाणून घ्या 'अवतार : द वे ऑफ वॉटर'बद्दल सर्वकाही...