नवी दिल्लीः भारताच्या अभिनेत्री जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहेत. अभिनय असो किंवा कमाई, या सर्वांमध्ये भारतीय अभिनेत्रींनी प्रचंड स्टारडम मिळवलं आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणचाही समावेश झाला आहे. फोर्ब्सच्या यादीत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या जगातील 10 अभिनेत्रींमध्ये दीपिका दहाव्या स्थानावर आहे.

 

फोर्ब्सच्या यादीत अमेरिकन अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स अव्वल स्थानी आहे. तिची वार्षिक कमाई 46 मिलीयन डॉलर एवढी आहे. मकार्थी दुसऱ्या स्थानावर आहे, तर 'कॅप्टन अमेरिकाः सिव्हिल वॉर' फेम स्कारलेट जॉन्सन 25 मिलीयन डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.

 

दीपिका पादुकोणची या वर्षाची कमाई 10 मिलीयन डॉलर एवढी आहे. फोर्ब्सच्या यादीत एंट्री करणारी दीपिका एकमेव नवीन अभिनेत्री आहे. कमाईचे आकडे 1 जून 2015 ते 1 जून 2016 दरम्यानचे आहेत.