Deadpool 3 : हॉलिवूडचा सुपरस्टार रयान रेनॉल्ड (Ryan Reynolds) आणि ह्यू जॅकमन (Hugh Jackman) सध्या त्यांच्या आगामी 'डेडपूल 3' (Deadpool 3) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक आऊट झाला आहे. फर्स्ट लुक आऊट झाल्यामुळे अॅक्शनचा तडका असलेल्या या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रेनॉल्ड्सने सोशल मीडियावर खास कॅप्शन शेअर करत 'डेडपूल 3'चा फर्स्ट लुक शेअर केला आहे आणि लिहिलं आहे,"पलकें मत झपकाएं". या फोमध्ये रेनॉल्ड डेडपूलच्या लूकमध्ये आणि ह्यू को वूल्वरिनच्या भूमिकेत दिसत आहे. 'डेडपूल 3'मधील रयान आणि ह्यूचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'डेडपूल 3' या सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शनचं काम सध्या सुरू आहे. शॉन लेवी (Shawn Levy) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शॉन यांनी याआधी रेनॉल्डच्या 'फ्री गाय' आणि 'द एडम प्रोजेक्ट' या सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. 'डेडपूल' या सिनेमाचा पहिल्यांदाच मार्वलच्या सिनेमॅटिक यूनिवर्समध्ये समावेश झाला आहे. अद्याप या सिनेमासंदर्भात अधिक माहिती समोर आलेली नाही.
'डेडपूल 3' हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? (Deadpool 3 Movie Released Date)
'डेडपूल 3' या सिनेमात रयान रेनॉल्ड्स आणि ह्यू जॅकमनसह अभिनेता मोरेना बैकारिन, ब्रायना हिल्डेब्रांड, एम्मा कोरिन आणि मैथ्यू मॅकफैडेनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्री जेनिफर गार्नर या सिनेमात इलेक्ट्राच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. 'डेडपूल 3' हा बहुचर्चित सिनेमा 3 मे 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'डेडपूल 3' हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'डेडपूल 3' हा सिनेमा 'डेडपूल' या कादंबरीवर आधारित आहे. मार्वल स्टुडियोजच्या अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 2016 मध्ये या सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लंडनमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. आता या बहुचर्चित सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. रेट रीज, पॉल वर्निक, जेब वेल्स, रेन रेनॉल्ड्स आणि शॉन लेवी यांनी या सिनेमांचं लेखन केलं आहे.
संबंधित बातम्या