De Dhakka 2 Trailer : 2008 मध्ये दिग्दर्शित झालेला‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) हा चित्रपट लोक आजही आवडीनं पाहतात. आता 14 वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होणार आहे. दे धक्का-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये जाधव कुटुंब हे लंडनमध्ये धमाल करताना दिसत आहे.
पाहा ट्रेलर:
‘दे धक्का 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘दे धक्का 2’च्या टीझरमुळे प्रेक्षकही उत्सुक झाले असून, त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव, सुमती जाधव, धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसनाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत.
‘दे धक्का’ हा चित्रपट 2008साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसून आले होते. ‘दे धक्का’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, सचित पाटील या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचा पहिला भाग अतुल काळे आणि सुदेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता. तर, महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचे लेखन केले होते. दे धक्काः2 मधील गाणी देखील प्रदर्शित झाली आहेत. देह पेटूदे हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
यंदा होणार थेट ‘लंडन’वारी!
यावेळेस ही धमाल ट्रीप मुंबई-कोल्हापूर नाही तर, कोल्हापूर ते थेट लंडन असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पोस्टरमध्ये लंडनची झलक पाहून यंदा धमाल आणि मनोरंजनाचा मोठा डोस प्रेक्षकांना मिळणार आहे, हे लक्षात येते.
हेही वाचा: