Zubeen Garg : ‘या अली’ फेम गायक झुबीन गर्ग (Zubeen Garg) यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आसाममध्ये एका कॉन्सर्ट दरम्यान हॉटेलमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. प्राथमिक माहितीनुसार त्यांना फिट आल्याने ते चक्कर येऊन पडले आणि या दरम्यान डोक्याला मार लागल्याने ते बेशुद्ध झाले होते. यानंतर त्यांना तातडीने एअरलिफ्ट करून गुवाहाटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.


गायक झुबीन गर्ग यांनी मंगळवारी रात्री अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर ते फिट येऊन बाथरूममध्ये पडले आणि डोक्याला मार लागून बेशुद्ध झाले. गायकाला बेशुद्ध अवस्थेत पाहून त्यांच्या टीमने तत्काळ वैद्यकीय मदत बोलवली. यानंतर झुबीन यांना एअर अॅम्ब्युलन्समधून गुवाहाटी येथे नेण्यात आले.


फिट आल्याने पडले बेशुद्ध


झुबीनला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे सीटी स्कॅन केले. मीडियाला या संदर्भात माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, झुबीन गर्ग यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर राणा बरुणा यांनी सांगितले की, त्यांना कोणतीही गंभीर आजार नसून, केवळ फिट आल्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिब्रुगडच्या उपायुक्तांना गायक झुबीन गर्ग यांच्या देखभालीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, त्यांना लागेल ती मदत आणि उपचार देण्यातही विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.


अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी केली सुपरहिट गाणी


बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या 'गँगस्टर' चित्रपटातील 'या अली' या गाण्याने झुबीन गर्ग यांना खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यांनी 'क्रिश 3' मधील 'दिल तू ही बता' यासह गाण्यासह बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये हिट गाणी दिली आहेत. त्यांनी अनेक आसामी, बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीतही दिले आहे. इतकेच नाही तर, झुबीन गर्ग यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शनही केले आहे. बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त झुबीन गर्ग लोक संगीतातही विशेष योगदान देत आहेत.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 21 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या