मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचा 28 वर्षांपूर्वी आलेल्या 'चालबाज' या सिनेमाचा रिमेक बनणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन करणार आहेत. 'चालबाज'च्या रिमेकमध्ये आलिया भटला साईन करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या सिनेमासाठी आलियाच्या निवडीला श्रीदेवीनेही पसंती दर्शवली आहे.


श्रीदेवी, रजनीकांत आणि सनी देओल यांची प्रमुख भूमिका असलेला दिग्दर्शक पंकज पराशर यांचा 'चालबाज' सिनेमा आता नव्या फ्लेवरमध्ये मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

डेव्हिड धवन मागील काही काळापासून 'चालबाज'ची कहाणी नव्या रुपात दाखवण्याच्या विचारात होते. रिमेकमध्ये प्रमुख आणि डबल रोल साकारणाऱ्या श्रीदेवीच्या जागी कोणाला घ्यावं, याचा शोध ते घेत होते.

डेव्हिड धवन यांना 'चालबाज'च्या रिमेकसाठी आलिया भट अतिशय योग्य असल्याचं वाटते. यासंदर्भात ते आलियाशी बोलले देखील आहेत.

'चालबाज'च्या रिमेकमध्ये काम करण्यास आलियाने होकार दिला, तर ती पहिल्यांदा डबल रोलमध्ये दिसेल.

डेव्हिड धवन यांनी 'चालबाज'मध्ये श्रीदेवीच्या व्यक्तिरेखेसाठी आलिया तर रजनीकांतच्या रोलसाठी मुलगा वरुण धवनला फायनल केलं आहे. अजून उर्वरित भूमिकांसाठी कास्टिंग सुरु आहे.