मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या विवाहाच्या बातम्या खोट्या असल्याचं अनुष्काच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्का ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत इटलीत विवाहबद्ध होतील. त्या दोघांचं लग्न हे हिंदू पद्धतीनं होणार असल्याचंही समजतं आहे.

येत्या 10 डिसेंबरपासून श्रीलंका-भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण  विराटला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. मात्र विराटला लग्नासाठीच श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून मुक्त करण्यात आल्याच्या चर्चा सुरु आहेत.

लग्नाची बातमी खोटी असल्याचं जरी सांगण्यात येत असलं तरी पुढच्या काही दिवसातच खरं काय आणि खोटं काय ते समोर येईलच.

संबंधित बातम्या :

येत्या शनिवारी विराट-अनुष्काचं लग्न?

विराटचा लग्नासाठी ब्रेक, डिसेंबरमध्ये अनुष्कासोबत लग्न?

‘मी नेहमी तुझी काळजी घेईन…’, विराटचं अनुष्काला वचन