मुंबई : सोशल मीडियाने सध्या डान्सिंग सेन्सेशन डब्बू अंकल अर्थात संजीव श्रीवास्तव यांना डोक्यावर घेतलं आहे. रातोरात सेलिब्रेटी झालेल्या डब्बू अंकलनी नुकतीच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची भेट घेतली.

गेल्या काही दिवसांपासून डब्बू अंकल अभिनंदनाचे फोन स्वीकारण्यात आणि बॉलिवूड कलाकारांची भेट घेण्यात व्यस्त आहेत. नुकतीच त्यांनी 'दस का दम' टीव्ही शोच्या सेटवर सलमान खानची भेट घेतली.

पत्नी अंजली आणि दोन मुलांसोबत संजीव श्रीवास्तव यांनी सलमानची भेट घेतली. भेटीचे फोटो त्यांनी ट्विटरवरही शेअर केले आहेत.


कोण आहेत नाचणारे काका?

एका लग्नातील जबरदस्त डान्समुळे सोशल मीडियावर फेमस झालेले संजीव श्रीवास्तव मध्य प्रदेशच्या विदिशात राहतात. डब्बू अंकल म्हणून त्यांना ओळखलं जातं. ग्वाल्हेरमध्ये 12 मे रोजी मेहुण्याच्या लग्नाच्या संगीतमध्ये त्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला.

गोविंदा आणि निलम यांच्या 'खुदगर्ज' (1987) चित्रपटातलं 'दिल बहलता है मेरा.. आपके आ जाने से' हे गाणं कोणे एके काळी प्रचंड गाजलं होतं. मोहम्मद अझिझ-साधना सरगम यांच्या आवाजातील या डान्स नंबरला गोविंदाने पुरेपूर न्याय दिला होता.

गोविंदाची डान्सिंग स्टाईलही होतीच हटके. ही स्टाईल अगदी हुबेहूब करुन दाखवणारे डब्बू अंकल... अंकल म्हणायला फक्त वयापुरते.. त्यांचा जोश, त्यांची एनर्जी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी..

नागपूर विद्यापीठ आणि नागपूरच्याच प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलेले संजीव श्रीवास्तव भाभा इंजिनिअरिंग रिचर्स इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात.

मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदाकडून डान्सची त्यांना प्रेरणा मिळाली. पण गोविंदाच्या गाण्यावर जास्त डान्स केले. कॉलेजमध्ये असताना स्टेजवर डान्स करायचो. पण 1998 मध्ये डान्स करणं बंद केलं होतं, असं संजीव श्रीवास्तव यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं.

सध्याच्या काळात हृतिक रोशनचा डान्स आवडतो, तो कम्प्लिट डान्सर आहे. त्याच्या 'कहो ना प्यार है' गाण्याच्या स्टेपवर डान्स केला होता, असंही ते म्हणाले.

व्हायरल झालेला डान्स

डान्सिंग अंकलला विदिशा महापालिकेचं मोठं गिफ्ट

गोविंदासारखा डान्स करणाऱ्या काकांचा पत्ता लागला!

'आप के आ जाने से..' काकांचा गोविंदा स्टाईल भन्नाट डान्स