Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांत (Rajinikanth) यांना UAE सरकारने गोल्डन व्हिसा (Golden Visa) दिला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. रजनीकांत नुकतेच अबुधाबीला गेले होते. त्यावेळी त्यांना गोल्डन व्हिसा देत गौरव करण्यात आला. याबद्दल रजनीकांत यांनी UAE सरकार आणि लुलू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एमए युसूफ अली यांचे आभार मानले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रजनीकांत यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते यूएई सरकारकडून मिळालेल्या गोल्डन व्हिसाबद्दल आभार मानताना दिसत आहेत. 


रजनीकांत व्हिडीओमध्ये म्हणत आहेत,"गोल्डन व्हिसा मिळणं ही अत्यंत सन्मानाची भावना आहे. UAE सरकारने प्रतिष्ठित गोल्डन व्हिसा देऊन गौरव केल्याबद्दल खूप-खूप आभार. मी अबुधाबी सरकार आणि माझे चांगले मित्र व्यवस्थापकीय संचालक एमए युसूफ अली यांचेही  विशेष आभार". रजनीकांत यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रजनीकांतला UAE सरकारकडून गोल्डन व्हिसा मिळाल्याने चाहतेही आनंदी झाले आहेत. रजनीकांत यांनी अलीकडेच लुलू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एमए युसूफ अली आणि त्यांच्या इतर उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 






रजनीकांत यांनी नुकतचं त्यांच्या आगामी 'वेट्टैयान' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. चाहत्यांना या चित्रपटाची खूप उत्सुकता आहे. टीजे ज्ञानवेलने या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लायका प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. रजनीकांतसह या चित्रपटात अमिताभ बच्चन, फहाद फासिल, राणा दग्गुबाती, मंजू वारियर आणि दुशारा विजयन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


'वेट्टैयान' चित्रपटासह रजनीकांत लोकेश कनगराजच्या 'कुली' या चित्रपटाचाही भाग असणार आहेत. टीझर शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. पण कॉपीराइट लागल्याने चित्रपट अडचणीत आला आहे.


संबंधित बातम्या


Rajinikanth Sridevi Affair : वीज गेली अन् अपूर्ण राहिले रजनीकांतचे प्रेम, श्रीदेवीला करणार होते प्रपोज