टीझरच्या सुरुवातीलाच पोलिस गवळीची उलटतपासणी करत असल्याचं दिसत आहे. अरुण गवळीची ओळख असलेला पांढरा कुर्ता पायजमा आणि गांधी टोपी अर्जुन रामपालने घातली आहे. खाली मान घालून पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देणारा डॅडी स्वतःचं नाव सांगायला तोंड वर करतो, तेव्हा त्याचा खुनशी चेहरा दिसतो.
टीझरमध्ये अरुण गवळीच्या आयुष्यातले अनेक क्षण दिसतात. गवळी समर्थकही लाडक्या 'डॅडी'चा उदोउदो करताना पाहायला मिळतात. इरॉस इंटरनॅशनलची निर्मिती असलेला 'डॅडी' हा चित्रपट अशिम अहलुवालिया यांनी दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी 'दगडी चाळ' या मराठी चित्रपटात मकरंद देशपांडे गवळींच्या भूमिकेत दिसला होता.