पुणे : दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचे सिनेमे आता टीव्ही चॅनलवरही पाहता येणार आहेत. दादा कोंडकेंच्या सिनेमांच्या हक्कांसंदर्भात सुरु असलेल्या खटल्याचा निकाल दादा कोंडेकेंच्या भाचे सून माणिक मोरे यांच्या बाजूने लागला आहे.

दादा कोंडके यांच्या सिनेमांच्या हक्कांवरुन दादा कोंडकेंच्या भाचे सून माणिक मोरे आणि नुपुर कंपनीत न्यायालयात खटला सुरु होता. नुपुर कंपनीने दादा कोंडकेंच्या चित्रपटांच्या बनावट सीडी आणि डीव्हीडी तयार करुन विकल्याचा माणिक मोरे यांचा आरोप होता. त्यासंदर्भात माणिक मोरेंनी नुपुर कंपनी विरोधात पुणे सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.

तब्बल 15 वर्षे माणिक मोरे आणि नुपुर कंपनीतला चालला. त्यानंतर या खटल्याचा निकाल माणिक मोरेंच्या बाजूने लागला. त्यामुळे माणिक मोरे आता त्यांच्या अधिकारामध्ये दादा कोंडकेंचे चित्रपट टीव्ही चॅनलवर लावण्यासाठी देऊ शकणार आहेत.

दादा कोंडकेंच्या एकूण 19 सिनेमांपैकी 17 सिनेमांचे हक्क माणिक मोरे यांच्याकडे आहेत. ज्यामध्ये ‘पांडू हवालदार’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘सोंगाड्या’, ‘वाजवू का’ या हीट चित्रपटांचा समावेश आहे.