Dada Kondke Birth Anniversary Special : मराठमोळे अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांची 8 ऑगस्टला 91 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रेक्षकांना त्यांचे गाजलेले सिनेमे पाहायला मिळणार आहेत. दादांच्या विनोदाच्या सरी येत्या 6 ऑगस्टपासूनच बरसणार आहेत. 


सत्तरच्या दशकात विनोदी सिनेमांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. गावरान मातीतला अस्सल विनोद, रोजच्या जगण्यातील कथा, खळखळून हसवणारे विनोदी संवाद यांची गट्टी जमवून दादा कोंडके नावाचं एक पर्व मराठी सिनेमासृष्टीत दाखल झालं. 1969 ला पडद्यावर आलेल्या ‘ तांबडी माती ’ या सिनेमाने अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक दादा कोंडके हे रत्न मराठी सिनेमाला दिले. त्यानंतर गेली 50 वर्षे दादा कोंडके हे नाव आजही मराठी सिनेमावर राज्य करत आहे. 






दादा कोंडके यांच्या सिनेमाची पारायणं करत सत्तरच्या दशकातील तरूणाईच नव्हे तर ज्येष्ठत्वाच्या उंबरठ्यावरचे प्रेक्षकही दादांसाठी वेडे होते. दादांच्या सिनेमांनी मराठी सिनेमा गाजवलेल्या काळातील प्रेक्षकांच्या पिढीची नाळ आजही दादांच्या सिनेमाशी जोडलेली आहे. आजच्या तरूणाईलाही दादांच्या सिनेमातील इरसाल विनोद हवाहवासा वाटतो , यातच दादांनी प्रेक्षकांची मनं  कशी  जिंकली आहेत हे दिसून येतं.


दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गाजलेल्या सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विनोदातील निखळपणा कायम ठेवत शाब्दीक कोट्यांमधून इरसाल फटाकडे वाजवणाऱ्या विनोदवीर अभिनेते , दिग्दर्शक ज्युबिलीस्टार दादा कोंडके यांच्या सहा ब्लॉकबस्टर सिनेमांची मेजवानी दादांच्या चाहत्यांना मिळणार आहे. 


दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त प्रेक्षकांना त्यांचे गाजलेले सिनेमे पाहायला मिळणार


सहा ऑगस्टपासून दर रविवारी दादा कोंडके यांच्या छप्परफाड प्रतिसाद मिळालेल्या सहा सिनेमांतून विनोदाच्या श्रावणसरी बरसणार आहेत. दुपारी 12 आणि सायंकाळी सहा वाजता दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांतून मनोरंजनाची बरसात होणार आहे. दादा कोंडकेंचे ब्लॉकबस्टर सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


"पोट धरून हसवायला येते आहे कोंडकेंची दादागिरी...दादा कोंडके यांच्या जयंतीनिमित्त घेऊन येत आहोत दादांचे गोल्डन ज्युबिली चित्रपट, घेऊन येत आहोत दादा कोंडकेंच्या सुपरहीट चित्रपटांचा नजराणा", असं म्हणत झी टॉकीजने घोषणा केली आहे.


संबंधित बातम्या


Dada Kondke : दादा कोंडकेंचं खरं नाव काय? जाणून घ्या त्यांचा सिनेप्रवास...