पुणे : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील अभिनेते मिलिंद दस्ताने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंत दस्ताने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादाचे वडील मंत्री प्रतापराव गायकवाड यांची भूमिका साकारत आहेत.


मिलिंद दस्ताने आणि त्यांच्या पत्नी सायली दस्ताने यांनी काही महिन्यापूर्वी पुण्यातील पु.ना. गाडगीळ ज्वेलर्समधून जवळपास 25 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली होती. मात्र दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी वेळेत पैसे परत न केल्याने त्यांच्याविरोधात गाडगीळ यांनी तक्रार दाखल केली.


मिलिंद दस्ताने यांनी 25.69 लाखांचे दागिने खरेदी केले होते. त्यांच्या जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर रक्कम हप्त्याने देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं, मात्र वर्षभरानंतरही त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यानंतर पु.ना. गाडगीळ ज्वलर्सच्या मालकांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि लवकरच त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मिलिंद दस्ताने यांच्याकडे पैसे नसतील तर त्यांनी खरेदी केलेलं सोनं परत करावं, अशी मागणी पु.ना. गाडगीळ ज्वलर्सच्या मालकांनी केली आहे. पोलीस दस्ताने यांच्या पुण्यातील घरी पोहोचले होते मात्र, त्याचा घराला कुलूप होतं. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


VIDEO | बातम्या सुपरफास्ट | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा