Raju Srivastav : विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastav)  यांनी आज जगाचा निरोप घेतला असून त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चाहत्यांसह सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


सुनील पाल (विनोदवीर) : राजू श्रीवास्तव यांचा जवळचा मित्र, विनोदवीर सुनील पाल  म्हणाला," राजू श्रीवास्तव यांना बघत मी मोठा झालो आहे. संघर्षाच्या सुरुवातीला राजू यांनी मला आर्थिक मदतदेखील केली आहे. माझ्या जडण-घडणीत राजू यांचा मोलाचा वाटा आहे". 


वीआईपी (विनोदवीर) : राजू श्रीवास्तव यांच्या आठवणींना उजाळा देताना वीआईपी यांना अश्रू अनावर झाले. वीआईपी आणि राजू यांनी अनेकदा एकत्र काम केलं आहे. दोघेही एकमेकांचे खास मित्र आहेत. राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यापासूनच खूप वाईट वाटत होतं. 


एहसान कुरैशी (विनोदवीर) : एहसान कुरैशी यांनी  'द ग्रेट इंडियन चॅलेंज' या विनोदी नाटकात राजू श्रीवास्तव यांच्यासोबत काम केलं आहे. या नाटकाच्या माध्यमातून एहसान आणि राजू यांची मैत्री अधिक वाढली. आठवणींना उजाळा देत एहसान म्हणाला,"घर घेण्यासाठी मला पाच लाख रुपयांची गरज होती. पण त्यासाठी माझ्याकडे तेवढे पैसे नसल्याने राजू यांनी कोणताच विचार न करता मला पाच लाख रुपये दिले". 


अशोक मिश्रा (खास मित्र) : राजू श्रीवास्तव यांच्या संघर्षाच्या दिवसापासून मी त्याच्यांसोबत आहेत. त्यामुळे त्यांचा संघर्ष मी खूप जवळून पाहिला आहे. आता त्यांच्या निधनाने खूप वाईट वाटत आहे, असं अशोक मिश्रा शोक व्यक्त करत म्हणाले. 


नवीन प्रभाकर (विनोदवीर) :   राजू श्रीवास्तव आणि मी अनेकदा एकत्र काम केलं आहे. 'राजू श्रीवास्तव और नवीन प्रभाकर नाइट्स' या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमामुळे दोघे चांगले मित्र झाले. राजू हा नेहमीच मला प्रोत्साहन आणि चांगले सल्ले द्यायचा. 


मैंने प्यार किया आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी काम केलं. तसेच  'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. राजू श्रीवास्तव यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.  राजू श्रीवास्तव यांना अनेक सेलिब्रीटी श्रद्धांजली वाहत आहेत. 


संबंधित बातम्या


Raju Srivastav Death :  कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Raju Srivastav Death :  'तारा निखळला'; राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडून शोक व्यक्त