INT : 'आयएनटी' (INT) हे महाविद्यालयीन तरुणांचं हक्काचं व्यासपीठ आहे. नुकतीच 'आयएनटी' ही आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा पार पडली आहे. या स्पर्धेत दादरच्या किर्ती महाविद्यालयाने बाजी मारली आहे. किर्ती महाविद्यालयाच्या 'उकळी' या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. 


परळच्या एम डी कॉलेजच्या 'बारम' एकांकिकेला द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. तर खालसा कॉलेजच्या 'काहीतरी अडकलंय' या एकांकिकेला तिसरं पारितोषिक मिळालं आहे. तर सलग दोन वर्ष 'आयएनटी'त बाजी मारलेलं रुईया कॉलेज शर्यतीत मागे पडलं आहे. 


'आयएनटी' या स्पर्धेच्या परीक्षणाची धुरा नाटककार विजय केंकरे, लेखक मुग्धा गोडबोले, लेखक राजीव जोशी यांनी सांभाळली आहे. तर या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट, येऊन येऊन येणार कोण, अशा जल्लोषामय वातावरणात 'आयएनटी' एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी 20 सप्टेंबरला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली आहे. 


दोन वर्षांनीदेखील विद्यार्थ्यांचा तोच उत्साह


गेली दोन वर्ष कोरोनामुळे 'आयएनटी' ही मानाची एकांकिका स्पर्धा पार पडली नव्हती. त्यामुळे यावर्षी अनेक महाविद्यालयाचे आजी-माजी नाट्यवेडे विद्यार्थी 'आयएनटी' या एकांकिका स्पर्धेला आवर्जून उपस्थित होते. आर. यू. आय. ए... रुईया..रुईया, आले आले एमडीचे आले, कीर्ती, कीर्ती, कीर्ती... छान...छान...छान, येऊन येऊन येणार कोण अशा जल्लोषबाजी वातावरणात पुन्हा एकदा आयएनटी ही मानाची एकांकिका स्पर्धा पार पडली. दोन वर्षांनीदेखील विद्यार्थ्यांमध्ये तोच उत्साह पाहायला मिळाला. 


अंतिम फेरीचा निकाल



  • सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम - उकळी (किर्ती कॉलेज)

  • सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय - बारम (एम. डी. कॉलेज)

  • सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय - काहीतरी अडकलंय (खाससा कॉलेज)

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - बारम (एम. डी. कॉलेज) ऋषिकेत मोहिते आणि यश पवार

  •  सर्वोत्कृष्ट लेखक - उकळी (किर्ती कॉलेज) चैतन्य सरदेशपांडे

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - श्रेयस काटकर ( किर्ती कॉलेज)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - निकीता झेपले (एम डी कॉलेज)

  • सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनय - रश्मी सांगळे (किर्ती कॉलेज)


संबंधित बातम्या


INT : 'आयएनटी'चं बिगुल वाजलं; 20 सप्टेंबरला होणार अंतिम फेरी


Aata Hou De Dhingana : स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या सेटवर अवतरली चंद्रमुखी; सिद्धार्थ अन् अमृतानं चंद्रा गाण्यावर धरला ठेका