कोल्हापूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा फार चांगला माणूस आहे, असं अभिनेता नाना पाटेकर यांनी म्हटलं. ते  कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नानांनी फडणवीसांच्या कामकाजाचं कौतुक केलं.


नाना पाटेकर हे ‘आपला मानूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोल्हापुरात आले होते.

सध्याचा विरोधी पक्ष हा निवडणूक डोक्यात ठेवून काम करतो, त्यामुळं तो विधानसभा आणि  लोकसभा चालू देत नाही. निवडणूक संपल्यानंतर दोघांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचं आहे, असं नानांनी नमूद केलं.

बाळासाहेबांमुळे राज आणि उद्धव हे दोघेही माझ्या जवळचे आहेत. बाळासाहेबांनी मला मुलासारखं वाढवलं, असं नाना म्हणाले.

बरेच वर्ष रेंगाळणारा सीमाप्रश्न लवकर सुटावा अशी अपेक्षा देखील नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.