Chrisann Pereira: सडक-2 (Sadak 2) चित्रपटातील अभिनेत्री  क्रिसॅन  परेरा ही (Chrisann Pereira) गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. क्रिसॅनला ड्रग्ज प्रकरणी शारजाह तुरुंगात ठेवण्यात आले होते.  आता ती लवकरच भारतात येणार आहे. क्रिसॅन ही भारतात कधी येणार? याबाबत आता तिच्या कुटुंबियांनी माहिती दिली आहे.


क्रिसॅनच्या कुटुंबानं दिली माहिती


क्रिसॅनच्या कुटुंबियांनी तिच्या चाहत्यांना मेसेज दिला आहे की,  'क्रिसॅनला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि भारतात परत येण्यासाठी तिला कमीत-कमी दोन ते जास्तीत जास्त तीन आठवडे लागू शकतात.   तुम्हा सर्वांना आम्ही तिच्या परतीची तारीख सांगू. ती भारतात सुखरूप परत येईपर्यंत तिच्यासाठी प्रार्थना करा. धन्यवाद.'




काय आहे प्रकरण? 


अभिनेत्री  क्रिसॅन परेराला ऑडिशनसाठी शारजाह, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पाठवण्यात आले. फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी  तिला एक ट्रॉफी देण्यात आली. या ट्रफीमध्ये ड्रग्स होते. तिला सांगण्यात आले की ही ट्रॉफी ऑडिशन प्रॉपचा भाग आहे. अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी क्रिसॅन परेराला शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आणि नंतर शारजा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. तपासादरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना समजले की, पॉल हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे .


भूलथापा देऊन शारजाला पाठवून सोबत अमली पदार्थ देऊन क्रिसॅन परेरालाला अडकवल्याचा आरोप अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे यांच्यावर करण्यात आला. पूर्व वैमनस्यातून क्रिसॅन आणि डी जे क्लेटन रॉड्रिग्जला अडकवल्याचा संशय आहे.  पोलीस या प्रकरणाचा पुढे तपास करत आहेत. मुंबई गुन्हे शाखेने  क्रिसॅनला ड्रग प्रकरणात अडकवणाऱ्या आरोपी अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे उर्फ रवी यांना अटक केलं असून ते 2 मे पोलीस कोठडीत आहेत. 






इतर महत्वाच्या बातम्या: 


क्रिसॅन परेरा हिनं काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सडक-2 या चित्रपटासोबतच तिनं बाटला हाऊस या चित्रपटात देखील काम केलं आहे.  तसेच मर्डर इन अगोंडा या वेब सीरिजमध्ये देखील क्रिसॅननं काम केलं. या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले.


Chrisann Pereira: 'तुरुंगात असताना डिटर्जंटने केस धुतले, टॉयलेटच्या पाण्यापासून कॉफी बनवली'; अभिनेत्री क्रिसॅन परेराने पात्रद्वारे दिली माहिती