Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतिक्षित 'डंकी' (Dunki) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांत हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. शाहरुख खानच्या 'डिंकी' या चित्रपटाशी संबंधित एक  अपडेट समोर आले आहे. या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) म्हणजेच सेन्सॉरने पास केले आहे. तसेच या चित्रपटाचा रनटाईम देखील समोर आला आहे. 


'डंकी'ला सेन्सॉरकडून मिळालं U/A सर्टिफिकेट 


'डंकी' या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून U/A प्रमाणपत्र मिळालं आहे. यासोबतच चित्रपटाचा रनटाइमही समोर आला आहे. 'डंकी' या चित्रपटाचा रनटाइम 2 तास 41 मिनिटे असणार आहे. डंकी या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू होण्यापूर्वीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट सीबीएफसी बोर्डाकडे प्रमाणपत्रासाठी पाठवला होता.


शाहरुखचा डंकी आणि प्रभासचा सालार येणार आमने-सामने


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाच शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. दोन्ही चित्रपट  21 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत.  


शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि तापसी पन्नूही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  


'डंकी' मधील गाण्यांना मिळाली प्रेक्षकांची पसंती


 ओ माही, लूट पूट गया  ही डंकी या चित्रपटामधील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 






डंकी म्हणजे काय?


डंकी या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच डंकी म्हणजे काय असा प्रश्न शाहरुखच्या चाहत्यांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर काही दिवसांपूर्वी शाहरुखनं दिलं होतं. "सगळे विचारत आहेत, म्हणून सांगतो. डंकीचा अर्थ आपल्या लोकांपासून दूर राहणे.", असं त्यानं सांगितलं होतं.


संबंधित बातम्या:


Dunki Drop 5: किंग खान आणि तापसीचा रोमँटिक अंदाज; डंकी चित्रपटातील 'ओ माही' गाणं रिलीज