Anup Ghoshal Passes Away:  प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल (Anup Ghoshal) यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  अनुप घोषाल (Anup Ghoshal Passes Away) हे अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते.  अनुप यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक चाहते आणि सेलेब्स गायकाला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.


पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अनुप घोषाल हे वयोमानाशी संबंधित आजारांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. दुपारी 1.40 वाजता त्यांचे निधन झाले.


ममता बॅनर्जी यांनी वाहिली श्रद्धांजली


अभिनेत्री पाओली डॅमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनूप घोषाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनूप घोषाल यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, "बंगाली, हिंदी आणि इतर भाषांमधील गाण्यांचे गायन केलेल्या अनूप घोषाल यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करते."


अनुप घोषाल यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. अनुप यांनी संगीत क्षेत्रात विशेष स्थान मिळवलं होतं, त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर उत्तरपारा मतदारसंघातून 2011 ची विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.






अनूप घोषाल हे लोकप्रिय गायक होते. त्यांचा जन्म 1945 मध्ये झाला. त्यांनी वयाच्या 4 व्या वर्षी तिचे संगीत प्रशिक्षण सुरू केले. ऑल इंडिया रेडिओ, कोलकाता येथून शिशु महल या  कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी गाणे गायले. 


अनूप घोषाल यांची लोकप्रिय गाणी (Anup Ghoshal Songs)


1983 मध्ये रिलीज झालेल्या 'मासूम' या चित्रपटातील 'तुझसे नाराज नहीं जिंदगी', 'हुस्न भी आप हैं, इश्क भी आप हैं' आणि 'शीशे का घर से तुम साथ हो जिंदगी भर लिए' या अनूप घोषाल यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  तपन सिन्हा या दिग्दर्शकांच्या चित्रपटातील गाणी देखील अनूप घोषाल यांनी गायली.  केवळ हिंदी आणि बंगालीच नाही तर इतर अनेक भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली.


संबंधित बातम्या:


Pedro Henrique Died: लाईव्ह परफॉर्म करतानाच आला हार्ट अटॅक; 30 व्या वर्षी गायकाचा स्टेजवर मृत्यू