मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध हिपहॉप गायक, संगीतकार ख्रिस ब्राऊन दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत. ख्रिसचं ब्रेकअप झालं असलं, तरी अॅमिका हॅरिस त्याच्या मुलाची आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ख्रिस आपल्या एक्स-गर्लफ्रेण्डकडे परतेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


आतापर्यंत ख्रिस किंवा अॅमिका या दोघांपैकी कोणीही तिच्या प्रेग्नन्सीविषयी जाहीर वाच्यता केलेली नाही. मात्र ख्रिसने अॅमिकाच्या सोशल मीडियावरील फोटोवर 'माय बेबी मामा' अशी कमेंट केल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. पितृत्व ही तुम्हाला अत्यंत विनम्र करणारी गोष्ट आहे, असं ख्रिसने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

30 वर्षांचा अविवाहित ख्रिस ब्राऊन दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. निया गुजमेनपासून त्याला पाच वर्षांची रॉयल्टी ही मुलगी आहे. ख्रिस काही महिन्यांपूर्वी अॅमिकासोबत रिलेशनशीपमध्ये होता. ब्रेकअपनंतर त्याचे इंडीमॅरी जेन पेल्टनशी सूत जुळले, मात्र तोवर अॅमिका प्रेग्नंट असल्याचं समोर आलं. त्यामुळे इंडीमॅरीसोबत ख्रिसचं ब्रेकअप झालं, असं म्हटलं जात आहे. आता तो अॅमिकाकडे परतणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

VIDEO | 'तुझ्यात जीव रंगला'मधील राणादाच्या वडिलांवर गुन्हा दाखल



ख्रिस ब्राऊनच्या एक्स गर्लफ्रेण्ड्सची संख्या कमी नाही. दहा वर्षांपूर्वी तत्कालीन गर्लफ्रेण्ड आणि गायिका रिआन्नावर हल्ला केल्याप्रकरणी ख्रिसविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल करण्यात आली होती.

ख्रिस ब्राऊनने 22 वर्षांच्या कारकीर्दीत ग्रॅमीसह अनेक महत्त्वाचे पुरस्कार खिशात घातले आहेत. एक्स्क्लुझिव्ह, ग्राफिटी, फॉर्च्युन, एक्स, रॉयल्टी, हार्टब्रेक ऑन अ फुल मून यासारखे त्याचे अल्बम्स प्रचंड गाजले आहेत.