Chhaava Trailer Controversy : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' चित्रपटासमोरच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे. या चित्रपटाच्या टीझरवरुन वाद सुरु झाला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांच्या छावा चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे. शिवप्रेमींनी या चित्रपटाचा विरोध केला आहे. निर्माता दिनेश विजन (Dinesh Vijan) याच्या आगामी छावा चित्रपटासमोर नवीन संकट उभं ठाकल्याचं दिसत आहे.


विकी कौशलचा 'छावा' वादात


विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर बहुप्रतिक्षित छावा चित्रपटाचा ट्रेलर तुकताच प्रदर्शित झाला असून त्यावर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. हा चित्रपट डिसेंबर 2024 मध्ये रिलीज होणार होता. मात्र, इतर चित्रपटांसोबत होणाऱ्या क्लॅशमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता हा चित्रपट 14 फ्रेबुव्रारी रिलीज होणार आहे. मात्र, त्यातही आता वादाची ठिणगी पडली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन शिवप्रेमींनी याला विरोध दर्शवला आहे.


शंभूराजे अन् येसूबाई यांच्यातील 'या' सीनमुळे वाद पेटला


अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' चित्रपटाच्या टिझरला शिवप्रेमींनी विरोध दर्शवला आहे. छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई नाचताना दाखवले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींनी या चित्रपटाचा विरोध केला आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट कुठे प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.