नवी दिल्लीः दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या आगामी उडता पंजाब या सिनेमावरुन महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत महाभारत सुरु झालं आहे. प्रदर्शनाआधीच सिनेमाच्या नावावरुन वाद सुरु झाले आहेत.


 

सेन्सॉर बोर्डाने सिनेमात एक-दोन नव्हे तर तब्बल 89 कटस् सुचवले आहेत. तसंच सिनेमाच्या नावातून पंजाब शब्द वगळण्याच्या सुचना केल्या आहेत.

 

सिनेमाच्या या वादामध्ये आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील उडी घेतली आहे. पंजाब राज्यामध्ये ड्रग्जची गंभीर समस्या आहे. या सिनेमातील दृश्यांवर बंदी आणून पंजाबमधील समस्या सुटणार नाही. त्यामुळे सरकारने परिस्थिती पाहून कठोर कारवाई करावी, अशा शब्दात राहुल गांधींनी सिनेमाचं समर्थन केलं आहे.

 

 

https://twitter.com/OfficeOfRG/status/740126292239089664

 

सिनेमाचे निर्माता अनुराग कश्यप यांनी सुद्धा सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त करत भारताची तुलना थेट उत्तर कोरियाशी केली आहे.

 

संबंधित बातम्याः

'उडता पंजाब' च्या वादात राहुल गांधीची उडी