मुंबई : अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार दिला आहे. हा चित्रपट असंस्कारी असल्याचा ठपका चित्रपट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी ठेवला आहे.


या चित्रपटात महिलांच्या आयुष्यातील घटनाक्रम दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये बोल्ड दृश्य, अपमानजनक शब्द आणि अश्लिल ऑडिओ असल्याचं निहलानी यांचं म्हणणं आहे. तसंच हा चित्रपट एका विशिष्ट समाजाप्रती असंवेदनशील असल्याचं पत्र निहलानी यांनी चित्रपटाचे निर्माते प्रकाश झा यांना कळवलं आहे. त्यामुळे निहलानी यांच्यावर सिनेसृष्टीतून टीका होत आहे.

या चित्रपटात रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, विक्रांत मॅसी, अहाना कुमरा, प्लाबिता बोरठाकूर आणि शशांक अरोरा हे चित्रपटात प्रमुख भुमिकेत आहे. मुस्लीम धर्मातील ट्रिपल तलाक पद्धतीवर हा चित्रपट भाष्य करतो. मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला लैंगिक समानतेवर भाष्य केल्याबद्दल ऑक्सफेम पुरस्कार देण्यात आला होता.

चार महिलांवर आधारित सिनेमाची कहाणी
या सिनेमाची कहाणी भारतातील एका छोट्या शहरातील चार महिलांची आहे. या महिला स्वातंत्र्याच्या शोधात आहेत. त्यांना समाजाच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे. मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला सर्वोकृष्ट चित्रपटासाठी ऑक्सफेम अवॉर्ड मिळालं आहे.