मुंबई : मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री आएशा टाकिया पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी अभिनयासाठी नाही तर तिच्या लुक्समुळे तिची चर्चा आहे. आएशा टाकियाने लिप सर्जरी केली आहे. त्यानंतर ती अगदीच बदलून गेली आहे.

आएशा टाकिया नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. मात्र अनेकांना तर तिला ओळखताही आलं नाही. तिची सर्जरी चुकल्याचंच वाटत होतं.



सोशल मीडियावर आएशाचा लेटेस्ट लुकचा फोटो व्हायरल होत आहे. तिने लिप जॉब केल्याचं म्हटलं जात आहे. या फोटोमध्ये तिचे ओठ आधीपेक्षा जास्त मोठे आणि जाड दिसत आहेत.

एखाद्या अभिनेत्रीने लिप सर्जरी करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक अभिनेत्रींनी सर्जरी केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये अनुष्का शर्मा यांचाही समावेश आहे.



आएशाच्या या लूकनंतर सोशल मीडियावर तिची थट्टा सुरु झाली. जेएनयूमधील सब्सिडीच्या जेवणामुळे तिचा ओठ जाड झाल्याचं एकाने लिहिलं. तर कोणीही स्वत:च्या नैसर्गिक सौंदर्यासोबत छेडछाड करु नये, असं सल्लाही देण्यात आला.

सात वर्षांच्या गॅपनंतर आएशा टाकिया पुन्हा एकदा ग्लॅमरच्या दुनियेत कमबॅक करत आहे. भूमिकांसाठी सध्या तिची दोन प्रॉडक्शन हाऊससोबत बातचीत सुरु आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये अमित मिश्राच्या एका म्युझिक व्हिडीओ आएश टाकियाने काम केलं होतं. पण त्याची रिलीज डेट अजूनही ठरलेली नाही.