मुंबई : 'सैराट'सारख्या सिनेमांमुळे मुलं बिघडत आहेत, बलात्काराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे 'सैराट'सारख्या चित्रपटांवर बंदी घाला, अशी अजब मागणी भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी केलं आहे.
विधानसभा कोपर्डी बलात्कार प्रकरणाची चर्चा असतानाच मनिषा चौधरी यांनी हे विधान केलं आहे.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सौदी अरेबियात ज्याप्रमाणे शिक्षा दिली जाते, तशीच द्यावी. बलात्कारानंतर खटला चालेल, दोषीला शिक्षा होईल, ही प्रक्रिया मोठी आहे. त्यामुळे महिला-मुलींवर बलात्कार झाला की तातडीने नराधमाचे हात तोडले पाहिजेत, असंही मनिषा चौधरी म्हणाल्या.