मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाला 300 कट्स सुचवल्याच्या वृत्ताचा सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी इन्कार केला आहे. 'निर्मात्यांनी फक्त पाच बदलांसह पद्मावत चित्रपट जमा केला असून त्याला यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे' अशी माहिती प्रसून जोशींनी दिली.

'सल्लागार समितीच्या टिपण्या, सूचना आणि समाजाच्या भावना लक्षात घेण्याचा प्रयत्न केला आहे. सेन्सॉर बोर्डाला याबाबत आधीच माहिती देण्यात आली होती आणि चित्रपटाला यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे' असं प्रसून जोशी यांनी सांगितलं. सीबीएफसीची प्रक्रिया पूर्ण झाली असून 300 कट्स केल्याचं वृत्त चुकीचं असल्याचा दावा प्रसून जोशींनी केला आहे. सेन्सॉर बोर्डाला नाहक बदनाम केलं जात असल्याचंही जोशी म्हणाले.

'पद्मावत' चित्रपटात दिल्ली, चित्तोडगढ आणि मेवाडशी संबंधित सर्व संदर्भ हटवण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर सिनेमात 300 कट्स करण्यात आले, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र सेन्सॉर बोर्डाने केवळ पाच बदल सुचवून  यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे, असं प्रसून जोशी म्हणाले.

25 जानेवारीच्या मुहूर्तावर अखेर 'पद्मावत' या नावाने चित्रपट रीलिज होणार आहे. मात्र राजस्थान सरकार हा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्यावर ठाम आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी 'पद्मावत' प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला. राजपूत संघटना करणी सेनेनेही 'पद्मावत' प्रदर्शित केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी धमकी दिली आहे.

'पद्मावती'चं 'पद्मावत'

पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट हवं असल्याचं त्याचं नामकरण 'पद्मावत' करावं अशी सूचना केंद्रीय चित्रपट निरीक्षण मंडळातर्फे देण्यात आली होती. इतिहास नाही, तर पद्मावत ही काल्पनिक कलाकृती या चित्रपटाच्या सर्जनशीलतेचा स्रोत असल्याचं दिग्दर्शकाने म्हटलं आहे. म्हणून भन्साळींना सिनेमाचं नावही पद्मावत ठेवण्यास सांगितल्याचं सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी म्हणाले होते.

सतीच्या परंपरेचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, असंही डिस्क्लेमर देण्यास दिग्दर्शकाला सांगण्यात आलं होतं.

घुमर या गाण्यातही बदल करण्याची सूचना सीबीएफसीने दिली होती. चित्रपटात दाखवलेल्या व्यक्तिरेखेचं वर्णन साजेसं व्हावं, यासाठी हा बदल सुचवल्याचं जोशींनी सांगितलं होतं. ऐतिहासिक वास्तूंशी निगडीत अयोग्य /दिशाभूल करणारे संदर्भ बदलून घ्यावेत, असंही सेन्सॉर बोर्डाने सुचवलं होतं.

करणी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने 'पद्मावती'संदर्भात वाद निर्माण झाला होता. राजपुतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे.

'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं. अखेर 25 जानेवारी 2018 रोजी हा चित्रपट 'पद्मावत' नावाने प्रदर्शित होणार आहे.

हा सिनेमा अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचं सिनेकर्त्यांनी सांगितल्यामुळे केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने इतिहासतज्ज्ञ आणि राजघराण्यातील काही व्यक्तींना पद्मावती पाहण्यासाठी सहा सदस्यीय समितीला निमंत्रित केलं होतं. निर्मात्यांनी 'पद्मावती अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित' असल्याचं सांगून संकट ओढावून घेतल्याचं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं होतं.

'पद्मावती काल्पनिक आहे की ऐतिहासिक घटनांवर आधारित' यासंबंधी विचारणा करणारा फॉर्ममधील भाग रिकामा ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाची कॉपी निर्मात्यांना परत पाठवली होती.

दीपिका, शाहिद आणि रणवीर प्रमुख भूमिकेत

राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन असून शाहिद कपूरने राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पद्मावत चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.

रणवीर सिंह पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.

संबंधित बातम्या


पद्मावती'चं नाव बदलण्याची शक्यता, नवं नाव...


म्हणून 'पद्मावती'चं नाव 'पद्मावत' करण्याची सूचना : प्रसून जोशी


'पद्मावती'चं भविष्य इतिहासतज्ज्ञांच्या हाती, मार्चमध्ये रिलीज?

आधी 'पद्मावती' चित्रपट बघा, मग बोला, शाहीदचा संताप

‘पद्मावती’चं प्रदर्शन रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू संसदीय बोर्डाच्या कोर्टात

‘पद्मावती’ चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा

‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन

… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज

सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली

‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर

एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज

दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज

रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा

रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं