Cannes Film Festival : 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (Cannes International Film Festival) हा सर्वात मोठा महोत्सव मानला जातो. यंदा 17 ते 28 मे दरम्यान 75 वा कान्स चित्रपट महोत्सव होणार आहे. तसेच यंदाच्या महोत्सावाची खासियत म्हणजे या महोत्साव स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा होणार आहे. यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सावात वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत.
कान्स चित्रपट महोत्सवाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवात सहभागी होणार 'हे' कलाकार
कान्स चित्रपट महोत्सवात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होणार आहे. अक्षय कुमार, आर के रहमान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पूजा हेगडे, प्रसून जोशी, आर माधवन, शेखर कपूर, तमन्ना भाटिया आणि वाणी त्रिपाठी हे कलाकार हजेरी लावणार आहेत.
'कान्स' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तीन भारतीय सिनेमांनी मारली बाजी
कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तीन भारतीय सिनेमांनी बाजी मारली आहे. पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona) या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आहे. फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन यांच्या अध्यक्षतेखालील 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी 8 सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. चित्रपट महोत्सवात अभिनेत्री दीपिका पदुकोण ज्युरी म्हणून दिसणार आहे. तर सत्यजित रे यांचा 'प्रतिद्वंदी' हा सिनेमा यंदा कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.
संबंधित बातम्या