Bollywood Actress Life : बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्यांची पर्सनल लाईफ प्रत्येकाच्याच आवडीचा विषय. कधी दबक्या आवाजात, तर कधी उघडपणे अनेक सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आपण बोलणार आहोत. ही अशी बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आहे, जिनं तिच्या करिअरची सुरुवात इंग्रजी चित्रपटातून केली, त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली. त्यावेळी ती देशातीलच नव्हे विदेशातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली होती. तिच्या सौंदर्यावर अनेकजण घायाळ झाले होते. अशातच एक बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक या प्रतिभावान आणि सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. हा दिग्दर्शक तिच्या प्रेमात एवढा वेडा झाला की, त्यानं आपला धर्म बदलला. दोघांनी लग्न केलं. आज ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रसिद्ध दिग्दर्शक एका बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीचे पालक आहेत. 


थ्रोबॅक पिक्चरमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण?


एका दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत, त्यापैकी एका फोटोमध्ये तिनं साडी नेसली आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये ती वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहून तुम्ही ती कोण आहे? याच विचारात असाल. त्यामुळे आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता, आम्ही तुम्हाला सांगून टाकतो ही सौंदर्यवती नेमकी आहे तरी कोण? फोटोत दिसणारी ही सौंदर्यवती दुसरी कोणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची आई आणि महेश भट्ट यांची पत्नी 'सोनी राजदान' आहे.






सोनीसोबत लग्न करण्यासाठी महेश भट्ट यांनी बदलला धर्म 


सोनी राजदान यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1956 रोजी बर्मिंगहॅम, इंग्लंडमध्ये झाला. जॉन फ्लॉवर या इंग्रजी थिएटर चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी 1986 च्या दूरदर्शनवरची मालिका बुनियादमध्ये सुलोचना नावाच्या महिलेची भूमिका साकारली. त्यांनी 36 चौरंगी लेन, पेज 3 आणि सडक यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे, परंतु सोनी यांच्या प्रेमकथेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.


दरम्यान, सोनी राजदाननं 20 एप्रिल 1986 रोजी बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी लग्न केलं, जे त्यांच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठे होते, परंतु त्यावेळी महेश भट्ट आधीच विवाहित होते आणि त्यांनी किरण भट्ट नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं. पण, महेश भट्ट सोनी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. सोनी यांच्यासाठी त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. महेश भट्ट यांनी सोनी राजदान यांच्या लग्न करण्यासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि त्यानंतर सोनी यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली, ती मुलगी म्हणजे, आलिया भट्ट जी आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तर, महेश भट्ट यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. ती मुलगी मुलगी म्हणजे, बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेली पूजा भट्ट. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Filmstar Life : आई-वडिल 'सुपरस्टार', पण दोन्ही मुलं 'सुपरफ्लॉप'; एका मुलानं तर बुडवली 100 कोटींची फिल्म, ओळखलंत का?