Parineeti Chopra and Raghav Chadha: अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे  राघव चड्ढा (Raghav Chadha) हे दोघे 24 सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. या दोघांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये पार पडणार आहे. नुकताच परिणीतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती ही फोटोग्राफर्सवर भडकलेली दिसत आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये परिणीती फोटोग्राफर्सवर भडकताना दिसत आहे. परिणीती गाडीतून खाली उतरताच  फोटोग्राफर्स तिच्यासमोर कॅमेरे घेऊन येतात. त्यानंतर परिणीती  फोटोग्राफर्सला म्हणते, 'मी तुम्हाला बोलवलं नाही.हे बंद करा. मी तुम्हाला विनंती करत आहे.' परिणीतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघेही 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये  लग्न करणार आहेत. यानंतर हे जोडपे 30 सप्टेंबर रोजी 'ताज लेक' येथे त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी देणार आहेत. 23 सप्टेंबर रोजी पाहुण्यांसाठी  भोजनाचे आयोजन करण्‍यात आले आहे.


परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले. पंजाबमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असताना परिणीती राघवला पहिल्यांदा भेटली. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 


परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा 13 मे 2023 रोजी दिल्लीमध्ये साखरपुडा झाला होता. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच अनेक दिग्गज मंडळींनी परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. 






परिणीतीचा आगामी चित्रपट


परिणीतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा कोडनेम तिरंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. परिणीती ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. 'चमकिला' या आगामी चित्रपटामध्ये परिणीती ही दिलजीत दोसांझसोबत काम करणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या:


Parineeti Chopra and Raghav Chadha: उदयपूरमध्ये परिणीती, राघव यांचं शुभमंगल; थाटामाटात पार पडणार शाही विवाहसोहळा; कशी असेल वेडिंग थीम, रिसेप्शन अन् व्हेन्यू?