मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींबाबत होणाऱ्या गैरवर्तणुकीची प्रकरण समोर येऊ लागली आहेत. त्यात कितपत तथ्य आहे हे कळलेलं नाही. पण तापसी पन्नू, फातिमा सना शेख आदी अनेकींनी आपल्याला अनुभवाला आलेलं लैंगिक शोषण, असभ्य वर्तन बोलून दाखवलं आहे. आता यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. तिचं नाव आहे अभिनेत्री मंदना करीमी.


मंदना करीमी ही इराणीयन-भारतीय अभिनेत्री आहे. भाग जॉनी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पाऊल ठेवलं. त्यानंतर बिग बॉस 9 मध्येही ती स्पर्धक म्हणून उतरली. त्यातला तिचा परफॉर्मन्स जोरदार होता. त्या सीझनमध्ये तिची चर्चाही जोरदार झाली. या सीझनमध्ये तिने दुसरा नंबर मिळवला. मंदना करीमी आता नव्याने चर्चेत आली आहे. कारण तिने निर्माते धारिवाल यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. सध्या निर्माते महेंद्र धारिवाल यांच्या सिनेमात ती काम करते आहे.


भारती आणि हर्ष लिंबाचियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


धारिवाल यांच्या वर्तनाबाबत मंदना सांगते, मी त्या दिवशी माझं चित्रिकरण आटोपलं. त्यानंतर धारिवाल यांनी मला थांबण्याची विनंती केली. पण मला थांबणं शक्य नव्हतं. कारण माझी एक मिटींग ठरली होती. मी व्हॅनिटीमध्ये जाऊन कपडे बदलू लागले. पण तेवढ्यात धारिवाल आत आले आणि माझ्या आंगावर ओरडू लागले.' धारिवाल यांनी मात्र या प्रकाराचा इन्कार केला आहे. मी तिच्या व्हॅनिटीत गेलो. पण मी आधी दरवाजा वाजवला होता असा दावा ते करतायत.


कधीकाळी दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणारी भारती आता कोट्यवधींची मालकीन


या प्रकरणात कोण खरं बोलतं आहे ते अद्याप कळायला मार्ग नाही. पण गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये नायिकांना मिळणाऱ्या ट्रीटमेंटमध्ये सातत्याने वाद होत आहेत. अशा प्रकरणात सहानुभूती महिलांच्या बाजूने असते हे खरं असलं, तरी प्रत्येकवेळी पुरुष दोषी असतोच असं नाही.