BOX OFFICE : प्रभासची कमाल, साहो 400 कोटी पार
एबीपी माझा वेब टीम | 10 Sep 2019 10:59 AM (IST)
बाहुबली प्रभासचा बॉलिवूडमधला डेब्यू असलेला 'साहो' हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. समीक्षकांच्या पसंतीस न उतरलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु टीकेचा धनी झालेल्या 'साहो'ने मागील 10 दिवसांत चांगली कमाई केली आहे.
मुंबई : बाहुबली प्रभासचा बॉलिवूडमधला डेब्यू असलेला 'साहो' हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. समीक्षकांच्या पसंतीस न उतरलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु टीकेचा धनी झालेल्या 'साहो'ने मागील 10 दिवसांत चांगली कमाई केली आहे. साहोने जगभरात तब्बल 400 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती जाहीर केली. बाहुबली सीरिजनंतर साहो हा प्रभासचा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 350 कोटी रुपये इतके आहे. चित्रपटात प्रभाससह श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारतात हिंदी भाषेत या चित्रपटाने आतापर्यंत (10 दिवसात) 130.98 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 116.03 कोटी रुपयांची कमाई केली होती.