72 Hoorain Vs Neeyat Box Office: सध्या विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत आहे. 7 जुलै रोजी पवन मल्होत्रा (Pavan Malhotra) आणि आमिर बशीर (Aamir Bashir) यांची प्रमुख भूमिका असलेला 72 हूरें (72 Hoorain) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याच दिवशी अभिनेत्री विद्या बालनचा (Vidya Balan) नीयत (Neeyat) हा चित्रपट रिलीज झाला. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. जाणून घेऊयात 72 हूरें आणि नीयत या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत....
72 हूरें चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
72 हूरें या चित्रपटानं ओपनिंग-डेला 35 लाख रुपयांचे कलेक्सन केले आहे.आता शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (8 जुलै) 45 लाख एवढी कमाई केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय पूरण सिंह चौहान यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती अशोक पंडित यांनी केली आहे. निष्पाप तरुणांचं ब्रेन वॉश करुन त्यांना दहशतवादी संघटनेत कसं सामील केलं जातं याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे.
नीयत चित्रपटानं किती केली कमाई?
नीयत या चित्रपटानं ओपनिंग-डेला 1.02 कमाई केली. रिपोर्टनुसार, दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. विद्याशिवाय नीयत या चित्रपटात राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपानिता शर्मा, प्राजक्ता कोळी, शशांक अरोरा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.विक्रम मल्होत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे. नीयत हा चित्रपट Glass Onion: A Knives Out Mystery या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, असं म्हटलं जात आहे.
नीयत आणि 72 हूरें हे चित्रपट रविवारी (9 जुलै) किती कमाई करतील? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही चित्रपटांचे कौतुक अनेक जण सोशल मीडियावर करत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: