Box Office Collection:  गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 28 सप्टेंबर रोजी तीन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. फुकरे 3 (Fukrey 3), द वॅक्सिन वॉर (The Vaccine War) आणि चंद्रमुखी 2 (Chandramukhi 2) हे तीन चित्रपट 28 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आले. या तीन चित्रपटांचे दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात...


'फुकरे 3' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Fukrey 3  Box Office Collection)


फुकरे 3 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं  द वॅक्सिन वॉर आणि चंद्रमुखी 2 या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे.  सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, फुकरे 3 या चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.82  कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं  7.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे.  फुकरे 3 या चित्रपटानं दोन दिवसात  16.32 कोटींची कमाई केली आहे. फुकरे 3 चित्रपटामध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी, मनजोत सिंग आणि रिचा चढ्ढा .यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.






'द वॅक्सिन वॉर' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (The Vaccine War Box Office Collection


Sacnilk च्या रिपोर्टनुसार द वॅक्सिन वॉर या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 1.3 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने  85 लाखांची कमाई केली आहे.






'चंद्रमुखी 2' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Chandramukhi 2 Box Office Collection) 


चंद्रमुखी 2 चित्रपटानं पहिल्या दिवशी 8.25 कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाने हिंदीमध्ये 17 लाख रुपये, तमिळमध्ये 5.57 कोटी रुपये आणि तेलगूमध्ये 2.5 कोटी रुपये कमावले आहेत. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने  4.50 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर एकूण कलेक्शन 12.75 कोटी झाले आहे.






इतर महत्वाच्या बातम्या: 


Top 10 Hindi Net Of All Time: किंग खानचा जवान, सनीचा गदर-2 की सलमानचा बजरंगी भाईजान, आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता? जाणून घ्या टॉप-10 चित्रपटांची यादी