मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज केसमध्ये अटक झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती 2021 सालाच्या सुरुवातील बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीचा जवळचा मित्र रुमी जाफरी याने एका मुलाखतीत ही माहिती दिली.
दिग्दर्शक आणि लेखक रुमी जाफरी यानं सांगितलं की प्रत्येकाला हे वर्ष वाईट गेलंय, रियालाही या वर्षात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलंय. रुमी जाफरी म्हणाला की, "एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला एक महिना तुरुंगात काढावा लागला. या गोष्टीचा तिच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे."
रुमी जाफरी पुढे म्हणाला की, "पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला रिया बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल. ती ज्या परिस्थीतीतून गेलीय त्यानंतर तिच्यावर आपण आरोप करु शकत नाही." रिया चक्रवर्तीची तुरुंगातून सुटका झाली होती. तेव्हा रुमी जाफरीने तिची भेट घेतली होती आणि तिला बॉलिवूडमध्ये पुन्हा परतायला सांगितलं होतं.
रियाला जामीन
बॉलवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी त्याच्या वांद्रेतील घरात मृतावस्थेत सापडला होता. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं सात ऑक्टोबर रोजी रियाचा जामीन मंजूर केला होता.
ड्रग्ज प्रकरणात रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती यालाही अटक करण्यात आली होती. सप्टेंबरपासून तुरुंगात असलेला रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला एनडीपीएस कोर्टाने जामीन दिला. त्यापूर्वी विशेष न्यायालयानं आणि मुंबई उच्च न्यायालयानं त्याची जामीन याचिका फेटाळून लावली होती.
संबंधित बातम्या:
- SSR Case | सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास अजूनही सुरुच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करणार : सीबीआय
- पंतप्रधान मोदींना मागे टाकून सुशांत बनला मोस्ट सर्च सेलिब्रिटी, रिया चक्रवर्ती तिसऱ्या स्थानावर!
- NCB Drug Case Showik Gets Bail : रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकचा जामीन मंजूर, तीन महिन्यांनंतर तुरूंगातून बाहेर येणार