मुंबई : रुपेरी पडदा असो किंवा मग नाटकाचं व्यासपीठ, लेखन असो किंवा मग काव्यवाचन ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी कायमच प्रत्येक बाबतीत एक मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. अनेक नवोदित कलाकारांसाठी आदर्शस्थानी असणाऱ्या या अभिनेत्याचे विचारही तितकेच प्रगल्भ. मुळात अनेकदा भारावणारे. त्यांच्या विचारांचं असंच दर्शन होत आहे ते म्हणजे खुद्द कवी, शायर हुसैन हैदरी यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमधून.


आपल्याला जे विचार मांडायचे होते, जी गोष्ट आपल्या मनात कित्येक दिवसांपासून होती ते हुसैन साहेब केव्हाच बोलून व्यक्त झाले असं म्हणत नसिर यांनी एक कविता सादर केली आहे. 'हिंदुस्तानी मुसलमां' नावाची ही कविता.


जात, धर्म, पंथ या निकषांवर समाजाची, नव्हे तर देशाचीही विभागणी करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या अनेकांसाठी ही कविता म्हणजे चपराक. विचार करण्यास भाग पाडणारी अशी ही कविता ऐकताना देशातील परिस्थिती आणि काही अनुत्तरित प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येतात.





काही महिन्यांपूर्वीचा हा व्हिडीओ


हुसैन हैदरी यांनी हा व्हिडीओ शेअर करत तो काही महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगत त्यांनी लिहिलं, 'हा खरंतर दहा महिन्यांपूर्वीचाच व्हिडीओ आहे. ज्याबाबत मला सोशल मीडियामार्फत माहिती मिळाली'.


काय आहेत कवितेचे बोल...


सड़क पर सिगरेट पीते वक़्त
जो अजां सुनाई दी मुझको
तो याद आया के वक़्त है क्या
और बात ज़हन में ये आई
मैं कैसा मुसलमां हूं भाई?


मैं शिया हूँ या सुन्नी हूँ
मैं खोजा हूँ या बोहरी हूँ
मैं गांव से हूँ या शहरी हूँ
मैं बाग़ी हूँ या सूफी हूँ
मैं क़ौमी हूँ या ढोंगी हूँ....





मै हिंदुस्तानी मुसलमां हूँ..., असे बोल असणारी ही कविता थेट मनाचा ठाव घेत आहे. हैदरी यांनी ही कविता सर्वप्रथम 2017 मध्ये मुंबईतील एका कार्यक्रमात सादर केली होती. त्यांचाही व्हिडीओ कमालीचा व्हायरल झाला होता. अनेक चर्चा सत्रांमध्ये याच कवितेचा विषय निघाला होता.