Bollywood Stars Eid Wishes : आज जगभरात रमजान ईद (Eid 2023) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सेलिब्रिटीदेखील ईद साजरी करत आहेत. आता बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानपासून (Salman Khan) ते महेश बाबूपर्यंत (Mahesh Babu) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सलमान खान : सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सलमानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केल्याने यंदाची ईद त्याच्यासाठी खूपच खास आहे. सलमानने सोशल मीडियावर आमिर खान सोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने 'ईद मुबारक' असं कॅप्शन दिलं आहे.
महेश बाबू : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूदेखील (Mahesh Babu) ईद साजरी करत आहे. महेश बाबूने ट्वीट करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिलं आहे,"ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईदच्या शुभेच्छा".
ज्युनिअर एनटीआर : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरनेदेखील (Jr NTR) सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्वीट केलं आहे,"ईद मुबारक, यंदाची ईद तुमच्या प्रियजनांना आरोग्य, आनंद आणि आशा घेऊन येवो".
शाहरुख खान : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) दरवर्षी 'मन्नत'च्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देत असतो. यंदादेखील तो आपल्या कुटुंबियांसोबत ईद साजरी करणार आहे.
संजय दत्त : संजय दत्तच्या घरी ईदनिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्यासाठीदेखील यंदाची ईद खूपच खास आहे.
आज जगभरात ईद साजरी केली जात आहे. मुस्लीम बांधवांसाठीचा हा पवित्र सण आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित बातम्या