Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Leaked Online : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण आता भाईजानच्या चिंतेत वाढ झाली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा ऑनलाईन लिक झाला आहे.
सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा ऑनलाईन लिक झाला आहे. हा सिनेमा HD प्रींटमध्ये Filmyzilla, 123movies, Filmywap, Onlinemovieswatches, 123movierulz, Telegram, Tamilrockers यांसारख्या वेबसाइटवर प्रेक्षक पाहू शकतात.
'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा काही वेब पोर्टल्सवर 1080p, 720p,480p,360p,240p आणि HD प्रींटमध्ये प्रेक्षक डाउनलोड करू शकतात. त्यामुळे या सिनेमाच्या कमाईवर चांगलाच परिणाम होणार आहे. एकीकडे या सिनेमाच्या माध्यमातून सलमानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असून या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.
'किसी का भाई किसी की जान' किती कमाई करणार?
'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा ऑनलाईन लिक झाला असला तरी रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा 4500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. हा बहुचर्चित सिनेमा ओपनिंग डेला 15-20 कोटींची कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमात सलमानसह पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव गुयाल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, वेंकटेश हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच दाक्षिणात्य अभिनेता राम चरणची झलकदेखील या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सलमानचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा रिलीज झाल्याने ते सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहायला पसंती दर्शवतील.
संबंधित बातम्या