मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत 8 मे रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा होती. मुंबईत हा लग्नसोहळा होणार आहे. कपूर आणि अहुजा कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आनंद अहुजा आणि सोनम कपूर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. दोघं जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातं. अनेक पार्ट्यांनाही दोघांनी एकत्र हजेरी लावली आहे. आनंद अहुजा अॅपरल्स व्यवसायात असून सोनम त्याच्या ब्रँडचं प्रमोशन करताना वारंवार दिसते. मात्र लव्ह लाईफविषयी छेडलं असता सोनम आपल्या खाजगी आयुष्यावर बोलणं टाळत होती. जानेवारी महिन्यात सोनम आनंदच्या आईसोबत कोलकात्यात ज्वेलरी शॉपिंग करताना दिसली होती. तेव्हापासूनच दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. सोनम लवकरच 'वीरे दी वेडिंग' या होम प्रॉडक्शन चित्रपटात दिसणार आहे. करिना कपूर-खानही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. संबंधित बातम्या :

सोनम कपूरच्या लग्नाचं ठिकाण ठरलं?

सोनम कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार

सोनम कपूर-आनंद अहुजा एप्रिलमध्येच विवाहबंधनात?