मुंबई : सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बॉलिवूडचा 'सिंघम' म्हणजेच अजय देवगण मैदानात उतरला आहे. मुंबई पोलीस दलाच्या सायबर सेलने गुन्हेगारीविरोधात जनजागृती करण्यासाठी त्याची निवड केली आहे.


अभिनेता अजय देवगणने शुक्रवारी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. यात अभिनेता अजय देवगण लोकांना भामट्यांपासून सावधान राहण्याचं आवाहन करताना दिसतो आहे.


'बँक कर्मचारी असल्याचं सांगून कुणी तुमचं कार्ड ब्लॉक करण्याच्या नावावर वन टाइम पासवर्ड (ओटीपी), सीव्हीव्ही किंवा पासवर्ड मागत असेल, तर तुम्ही त्यांना तुमचा पासवर्ड अजिबात देऊ नका. तुम्हाला केलेला तो कॉल फ्रॉड असू शकतो, असं अजय या व्हिडीओतून सांगतो आहे.