मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 45 वा वाढदिवस. क्रिकेटचा देव सचिन आज 46व्या वर्षात पदार्पण करतोय. सचिनने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम रचले.

सचिनला गोलंदाजी करताना धडकी भरली नाही, असा एकही गोलंदाज जगात पाहायला मिळाला नाही. सचिनला गोलंदाजी करणं म्हणजे अनेकांसमोर करिअरचा प्रश्न होता.

सचिनच्या कारकिर्दीतील काही रेकॉर्ड, आकडेवारी आणि काही किस्सेही अनेकांच्या नजरेसमोर आहेत.

असाच एक सेहवागचा किस्सा आहे, जो क्रिकेटविश्व कधीही विसरु शकणार नाही.

पाकिस्तानविरुद्धच्या एका सामन्यात सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे मैदानावर होते. समोर गोलंदाजीसाठी शोएब अख्तर होता. त्यावेळी काय घडलं होतं, हे सेहवागने एका टीव्ही शोमध्ये सांगितलं होतं.

सचिनची कहाणी आणि सेहवागची जुबानी झाली ती एका टीव्ही शोमध्ये, त्या टीव्ही शोमध्ये अभिनेता शाहरुख खानने सचिनच्या खेळाविषयी सेहवागला विचारलं, त्यावर सेहवागने शोएब अख्तरचा एक किस्सा सांगितला.

सेहवाग म्हणाला, "मी बॅटिंग करत होतो आणि शोएब अख्तर बोलिंग करत होता. पण, शोएब प्रत्येक बॉल बाऊन्सर टाकत होता. शोएब मला म्हणाला होता ‘हूक मारके दिखा’? मी शोएबला तेव्हा उत्तर दिलं, नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे, त्याला सांग, तो मारुन दाखवेल.

त्यावेळी नॉन स्ट्राईकर एंडवर सचिन तेंडुलकर उभा होता आणि सचिनने पुढच्याच ओव्हरला शोएबच्या बाऊन्सरवर सिक्सर लगावला. तेव्हा सेहवाग शोएबला म्हणाला, बेटा बेटा होता है, और बाप बाप होता है.".

बाप बाप होता है....शोएब अख्तरला सेहवागच्या हटके शुभेच्छा !

VIDEO: