अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि तिचा पती रणवीर सिंग (Ranveer Singh) हे बॉलिवूडमधील  सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक आहे. दोघांची मोठी फॅन फॉलोविंग आहे. फॅन्स दोघांनाही सोशल मीडियावर फॉलो करताना दिसतात. रणवीर आणि दीपिका देखील अनेकदा सोबत स्पॉट होतात. रणवीर आणि दीपिका कामात बीजी असूनही देखील एकमेकांना वेळ देणे पसंत करतात. अलीकडेच रणवीरने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग (Ask Me Anything) सेशन ठेवले होते. या दरम्यान, पत्नी दीपिकानेही त्याला प्रश्न विचारला, ज्याला त्याने प्रेमाने उत्तर दिले.


आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान दीपिकाने रणवीरला विचारले, "तू घरी कधी येणार आहेत?" यावर रणवीर म्हणाला, "जेवण गरम कर, बाबू. मी आत्ताच पोहोचत आहे." यासोबतच रणवीरने दीपिकाला टॅग करताना किसचं इमोजीही शेअर केले. रणवीर आणि दीपिका एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांनाही हे दोघे एकत्र खुप जास्त आवडतात. 



Deepika-Ranveer Chat viral: दीपिकाने विचारलं 'तू घरी कधी येणार?'; रणवीर म्हणाला, 'जेवण गरम कर'


रणवीर-दीपिकाचे आगामी चित्रपट 


दीपिका शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे. यासह तिच्याकडे अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसह शकुन बत्राचा चित्रपट देखील आहे. त्याचबरोबर दीपिकाकडे प्रभास आणि हृतिक रोशनसोबत 'फायटर' हा चित्रपटही आहे. दुसरीकडे रणवीर सर्कसमध्ये पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे. रणवीर आणि दीपिका कबीर खानच्या '83' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. याशिवाय रणवीरकडे 'जयेशभाई जोरदार', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सारखे मोठे चित्रपट आहेत. दोघांना एकत्र देखील काही सुपरहिट सिनेमे केले आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातूनच त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली.