मुंबई : कोरोनाच्या विळख्यात आता हळूहळू बॉलिवूड सेलिब्रिटी येताना दिसत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने स्वत: ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. अक्षय सध्या होम क्वॉरंटाईन आहे.
अक्षय कुमारने ट्वीट करत सांगितलं की, आज सकाळी माझी कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी घरी क्वॉरंटाईन झालो आहे आणि सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार घेत आहे. विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी आणि स्वत: ची काळजी घ्यावी.
आलिया भट्ट, रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali), मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), क्रिती सेनन यांच्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.