Adipurush Movie Release Date: राज्यसरकारने 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होणार असल्याचे जाहिर केले आहे. लगेहात बॉलिवूड सिनेमे प्रदर्शित होण्याच्या तारखादेखील जाहिर होत आहेत. येत्या वर्षात जाहिर होणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दोन मोठ्या कलाकारांचे सिनेमे आमनेसामने येणार आहेत. अक्षय कुमार आणि साउथचा सुपरस्टार प्रभास हे ते दिग्गज कलाकार. 


'प्रभास' आणि 'सैफ अली खान'चा 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणयाची तारिख जाहीर झाली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 ला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर 'अक्षय कुमार' आणि 'भूमी पेडणेकरचा 'रक्षाबंधन' सिनेमादेखील 11 ऑगस्ट 2020 लाच प्रदर्शित
होत आहे.  अशाप्रकारे दोन्ही सिनेमे प्रदर्शित होण्याच्या तारखा सारख्याच आहेत. 'रक्षाबंधन' या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनीकेले होते. या सिनेमात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट आधी 5 नोव्हेंबर 2021 ला प्रदर्शित
होणार होता. 


'आदिपुरुष' या भाषांमध्ये होणार प्रदर्शित 
'आदिपुरुष' हा सिनेमा हिंदीसोबत तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करत आहेत. प्रभास व्यतिरिक्त चित्रपटात सैफ अली खान, कृती सेनन आणि सनी सिंह दिसून येतील. 'आदिपुरुष'ची कथा रामायणावर आधारित असू शकते. 


भावा-बहिनीच्या नात्यावर आधारित 'रक्षाबंधन' 
'रक्षाबंधन' सिनेमा हा भावाबहिनीच्या नात्यावर आधारित आहे. 'जीरो', 'रांझना' आणि 'तनु वेड्स मनु' या चित्रपटाचे लेखन केलेल्या हिमांशु शर्मा यांनीच 'रक्षाबंधन' सिनेमाचे लेखन केले आहे. अक्षय कुमारचे 'अतरंगी रे', 'पृथ्वीराज', 'राम सेतु', 'बच्चन पांडे' हे सिनेमे
पाइपलाईनमध्ये आहेत. 


'आदिपुरुष' मध्ये झळकणार मराठी कलाकार
'तान्हाजी' सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक ओम राऊतने 'आदिपुरुष' या महत्तवकांशी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमात अनेक मराठी कलाकार आहेत. देवदत्त नागे, तृप्ती तोरडमल आणि अभिनय बेर्डे या कलाकारांचा यात समावेश आहे. या सिनेमात हनुमानच्या 
व्यक्तिरेखेत अभिनेता देवदत्त नागे असणार आहे. त्यासाठी देवदत्त विशेष मेहनतदेखील घेत होता. 


'आदिपुरुष' बनवण्यासाठी घेतले अथक परिश्रम
हा चित्रपट बनविण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. चित्रपटात अनेक मोशनदेखील देण्याचा प्रयत्न केला आहे. इंटरनॅशनल सिनेमांसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा यात वापर केला आहे. भारतीय सिनेसृष्टीत पहिल्यांदाच अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला
आहे. म्हणूनच हा चित्रपट असामान्य ठरु शकतो.