Samantha Ruth Prabhu-Raj Nidimoru Wedding: नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांच्या घटस्फोटानं (Samantha Naga Chaitanya Divorce) अनेकांच्या भुवया उंचावलेल्या. चाहत्यांचं लाडकं जोडपं वेगळं झाल्यानं अनेकांच्या काळजात चर्र झालेलं. त्यातच घटस्फोटानंतर काही वर्षांत नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधली. त्यावेळी नागा चैतन्यला चाहत्यांनी ट्रोलही केलेलं. तसेच, समंथाबद्दल काळजी व्यक्त केलेली. पण, अशातच आता घटस्फोटाच्या चार वर्षांनी साऊथ सुपरस्टार अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिनं 'द फॅमिली मॅन'चे (The Family Man) दिग्दर्शक राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्याशी लग्न उरकलं आहे. एका खासगी समारंभात दोघांनी लग्न केल्याची माहिती मिळत आहे.
अभिनेत्री समंथा रूथ प्रभू सध्या तिच्या आयुष्याच्या एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. सध्या समंथांनं दुसरं लग्न उरकल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका खासगी सोहळ्यात समंथा आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी लग्न उरकल्याच्या चर्चा रंगल्यात. दरम्यान, समंथा किंवा दिग्दर्शक राज निदिमोरू या दोघांपैकी कुणीच याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
लाल रंगाची साडी नेसून समंथा दुसऱ्यांदा बनली नववधू
HT सिटीनं दिलेल्या माहितीनुसार, समंथा आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांनी सोमवारी सकाळी लग्न केलंय. दोघांचं लग्न एका छोटेखानी समारंभात अत्यंत खासगीत पार पडलं. ईशा योगा सेंटरच्या लिंग भैरवी मंदिरात दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नात 30 पाहुणे उपस्थित होते. समंथानं लग्नासाठी लाल रंगाची साडी नेसली होती.
दिग्दर्शक राज निदिमोरूच्या घटस्फोटीत पत्नीनं शेअर केलेली पोस्ट
रविवारपासूनच समंथा आणि राज निदिमोरू यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरलेला. राज आणि समंथा दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. राज यांची एक्स वाईफ Sshyamali De नं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केलेली. ज्यामध्ये लिहिलेलं की, "desperate people do desperate things..." या पोस्टनंतर समंथा आणि राज यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरलेला. 2022 मध्ये राज आणि Sshyamali नं घटस्फोट घेतलेला.
समांथा रूथ प्रभूचं पहिलं लग्न साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यशी झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून दोघांनी वेगवेगळे मार्ग निवडले. नागा चैतन्य यानं पुन्हा लग्न केलंय. त्यांनं अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न केलं. त्यांचं लग्न एका भव्य समारंभात पार पडलेलं.
नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर, समंथा आणि राज यांनी 'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलंय. त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली आणि दोघेही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
